व्हायरल व्हिडीओची सुरुवात महिला शिक्षिकेच्या डान्सने होते. हे पाहून बाजूलाच उभे असलेले शिक्षकांना स्वतःवर आवर घालता आला नाही. शेवटी हे शिक्षक स्टेजवर धाडकन उडी घेतात आणि डान्स करू लागतात. यावेळी ते
अशा प्रकारे ठुमके लावतात की पाहणारे सगळेच हसू लागतात. स्टेजवर मध्येच एन्ट्री घेणाऱ्या या गणिताच्या शिक्षकांचा भन्नाट ़डान्स पाहणं खरोखरंच रंजक आहे. काही वेळाने शाळेचे मुख्याध्यापक त्यांना थांबवायला येतात, पण गणिताचे सर काही थांबायचं नाव घेत नाहीत. शेवटी त्या ही वैतागून डोक्याला हात लावत तिथून निघून जातात.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ papisociety नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. शाळेच्या एका कार्यक्रमाचा हा व्हिडीओ आहे.






