संगीता गायकवाड या लासूरच्या रहिवाशी असून त्याच भागातील व लगतच्या स्टेशनवर फिरत भेळपूरी विकतात. अनेकदा स्टेशनवर बसून तर कधी ट्रेनमध्ये भेळ विकताना समोर काकडी, कांदा, शेव- कुरमुरे, मसाले भरलेली मोठी परडी घेऊन त्या बॉलिवूड गाण्यांवर Lip Sync करत व्हिडीओ बनवतात. तुमचा आत्मविश्वास आम्हाला खुप आवडतो असे त्यांचे अनेक चाहते कमेंट करून सांगत असतात.






