व्हायरल व्हिडीओमध्ये एक व्यक्ती बोटीमध्ये उभा असल्याचे दिसते. त्याच्या एका हातामध्ये मोठ्या आकाराचा मासा तर दुसऱ्या हातात आयफोन आहे. तो आयफोनवरुन माश्यासह सेल्फी काढत असल्याचे किंवा व्हिडीओ कॉलवर समोरच्या व्यक्तीला मासा दाखवत असल्याचे व्हिडीओच्या सुरुवातीला दिसते. पुढे तो हातातला मासा पुन्हा पाण्यात टाकायचा विचारात असतो. पण नकळत चुकून तो माश्याच्या जागी दुसऱ्या हातामध्ये असलेला महागडा आयफोन पाण्यामध्ये फेकून देतो. त्याला काही सेकंदातच आपली चूक लक्षात येते. आयफोन पकडण्याचा तो प्रयत्न करणार असतो पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते.
You threw the right one bro 😂 pic.twitter.com/ohhoxmZj36
— CCTV IDIOTS (@cctvidiots) April 5, 2023