Wild life…एक ग्लास मिळेल ? ‘कांगारू’ पोहोचला थेट ‘बार’मध्ये… पुढे झाले असं की… व्हिडिओ

0
1799

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक कांगारू थेट बारमध्ये पोहोचल्याचं दिसून येतंय. हा व्हिडीओ ऑस्ट्रेलियातल्या जॉन फॉरेस्ट नॅशनल पार्कच्या आत असलेल्या एका पबमधला असल्याचं सांगण्यात येतंय. हे पब तुमच्या आमच्या सारख्या माणसांसाठी नव्हे तर इथे फिरणाऱ्या कांगारूंसाठी आहे. या पबमध्ये इथले कांगारू सहजपणे बारमध्ये प्रवेश करू शकतात आणि बारभोवती फिरू शकतात. हे नॅशनल पार्क स्थानिक कांगारूंना नियमित भेटीसाठी प्रसिद्ध आहे.

जे ग्राहक तेथे मद्यपान करण्यासाठी उपस्थित होते, तिथे कांगारू पाहून त्यांना सुद्धा याचं काहीच आश्चर्य वाटलं नाही आणि त्यांनी शांत प्रतिक्रिया दिली. लोक कांगारूकडे जाताच, तो कोणताही गोंधळ न करता बारच्या पलीकडे गेलेला दिसून येतो.

हे सुध्दा नक्की वाचा
Pushpa… श्रीवल्ली गाणं..लग्नात वधू वर थिरकले पुष्पा स्टाईलने