अंबानींच्या घरामध्ये शिरण्यासाठी वापरली ट्रीक…. शेवटी नको तेच घडलं…Viral Video

0
68

मुकेश अंबानी यांचं घर मुंबईत अल्टामाउंट रोड या ठिकाणी आहे. खरं सांगायचं झालं तर ते घर नसून ४० हजार स्क्वेअर फीटमध्ये बांधलेली एक आलिशान इमारत आहे. ही इमारत बांधण्यासाठी अंबानी यांनी जवळपास १२ हजार कोटी रुपये खर्च केले असं म्हटलं जातं. त्यामुळे या घरात तुम्ही जी कल्पना कराल त्या सगळ्या सुख-सुविधा आहे. असो, पण या आलिशान दोन तरुण शिरण्याचा प्रयत्न करत होते. अन् जेव्हा त्यांना पकडलं गेलं तेव्हा ती श्रीमंत असल्याचा दावा करू लागले.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, ते म्हणताहेत… ते युरोपमधील अंबानी आहेत. अंबानी कुटुंब जेव्हा बालीमध्ये आलं होतं तेव्हा त्याच्या वडिलांनी त्यांचं जंगी स्वागत केलं होतं. त्यामुळे मुकेश अंबानी त्यांना ओळखतील. फक्त त्यांच्यापर्यंत घेऊन चला. पण सुरक्षारक्षकांनी त्यांचं काहीच ऐकलं नाही. ते विदेशी असल्यामुळे त्यांच्याकडे काही इन्वेटेशन कार्ड वगैरे आहे का? अशी विचारपूस करण्यात आली. पण त्यांच्याकडे काहीच नव्हतं. परिणामी त्यांना बाहेरूनच पिटाळण्यात आलं.https://x.com/gharkekalesh/status/1877581546422485078

मीडिया रिपोर्टनुसार हे दोन तरुण युट्यूबर्स आहेत. अन् व्हिडीओ व्लॉग करण्यासाठी ते आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत होते. पण सुरक्षारक्षकांमुळे त्यांची ही योजना फेल झाली. पण लक्षवेधी बाब म्हणजे गार्डसोबत झालेलं संभाषण त्यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं आणि हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.