गुप्तेंचा खुपणारा प्रश्न आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भडकले… व्हिडिओ

0
35

झी मराठीवरील ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाहुणे म्हणून बोलावण्यात आलं होतं. यात देवेंद्र फडणवीस यांनी बरेच खुलासे केले आहेत. खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमाचे सूत्र संचालक अवधूत गुप्ते याने ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांच्याबाबत प्रश्न विचारला. तेव्हा देवेंद्र फडणवीस संतापले.संजय राऊत यांच्या जुन्या वक्तव्याची एक क्लिप दाखवण्यात आली. त्यावर तुमची प्रतिक्रिया काय असं अवधूत गुप्ते याने विचारलं. तेव्हा मला वाटलं नव्हतं की तुम्ही अशाही माणसाला मला उत्तर द्यायला लावाल म्हणून… माझाही स्तर ठेवा, असं फडणवीस म्हणाले.