सोशल मीडियावर लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत, विद्यार्थ्यांपासून शिक्षकांपर्यंत, सरकारी अधिकाऱ्यांपासून सामान्यांपर्यंत सगळे सोशल मीडियावर असतात. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ शिक्षकाचा आहे. या शिक्षकानं एका गाण्यावरग भन्नाट डान्स केला आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. शिक्षक हे स्टेजवर विद्यार्थ्यांच्या समोर नाचत आहेत. पाव्हणं जेवला का या गाण्यावर त्यांनी ठेका धरला आहे. त्यांच्या सोबत विद्यार्थी उभे आहेत. जे वेगवेगळ्या इयत्तेतील दिसत आहेत. या विद्यार्थ्यांनीही शिक्षकांसोबत गाण्यावर ताल धरला आहे.शिक्षकांबरोबरच विद्यार्थीदोखील उत्साहाने डान्स करताना दिसत आहेत. यावेळी विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकांच्याही डान्सने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ vilas_digi_teacher नावाच्या एक्स अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. ‘आई शपथ सांगतो असे शिक्षक माझ्या वेळेसही नव्हते’, असं त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे.






