Tuesday, May 21, 2024

आध्यात्मिक व धार्मिकतेतुन सुसंस्कृत पिढी निर्माण होते – दत्तात्रय मुदगल

आध्यात्मिक व धार्मिकतेतुन सुसंस्कृत पिढी निर्माण होते – दत्तात्रय मुदगल

अहमदनगर प्रतिनिधी – श्री.छत्रपती शिवराय तरुण मंडळ व नालेगाव पावन हनुमान व्यायाम शाळा यांच्यावतीने गेली तीस वर्षापासून श्रीरामनवमी व हनुमान जयंती निमित्त ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते याही वर्षी सालाबाद प्रमाणे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आध्यात्मिक व धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून सुसंस्कृत पिढी निर्माण होण्यास मदत मदत होते. सर्व जाती धर्मातील लोक एकत्रित येऊन धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करून समाजामध्ये जनजागृती करतात, आजच्या युवा पिढीला अध्यात्मिकतेची व धार्मिकतेची गोडी निर्माण व्हावी यासाठी नालेगाव येथील गाडगीळ पटांगण येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले गेले आहे. यामध्ये आज सायंकाळी हनुमान चालीसा पठण कार्यक्रमाचे आयोजन केले आहे तर दि.९ एप्रिल रोजी ह.भ.प.बाळासाहेब महाराज रंजाळे निमगाव खैरी यांचे किर्तन, दि.१० एप्रिल रोजी ह.भ.प.दुर्गाताई महाराज पोकळे संभाजीनगर यांचे कीर्तन, दि.११ एप्रिल रोजी ह.भ.प. केदारनाथ महाराज शास्त्री पैठण येथील यांचे कीर्तन, दि.१२ एप्रिल रोजी ह.भ.प. वेणुनाथ महाराज मिरीकर यांचे कीर्तन, दि.१३ एप्रिल रोजी ह.भ.प. नारायण महाराज औटी कोरडगाव येथील यांचे कीर्तन, दि.१४ एप्रिल रोजी मारुती महाराज झिरपे यांचे कीर्तन तसेच दि.१५ एप्रिल रोजी ह.भ.प.सुनिताताई महाराज ढोले संभाजीनगर येथील त्यांचे कीर्तन व दि.१६ एप्रिल रोजी दिंडी प्रदक्षणा व ह.भ.प.गणेश महाराज गायके यांचे काल्याचे कीर्तन होईल याच दिवशी आ.अरुणकाका जगताप व आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते महाआरती व महाप्रसादाचे वाटप केले जाणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्तात्रेय तात्या मुदगल व देविदास मुदगल यांनी दिली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles