Tuesday, May 21, 2024

नगरमधील व्यापारी वर्तुळातील महत्त्वाची बातमी…आडतेबाजार मचर्ंटस असोसिएशनचे विद्यमान संचालक मंडळ बरखास्त

अहमदनगर आडते बाजार मर्चंट असोसिएशन ने माननीय सहाय्यक धर्मदाय आयुक्तांकडे दाखल केलेला स्कीम अर्ज मंजूर होऊन संस्थेचे प्रथम विश्वस्त मंडळ पाच वर्षाच्या मदतीकरिता माननीय सहाय्यक धर्मदाय आयुक्त श्री सातव साहेब यांचे आदेशानुसार जाहीर करण्यात आले आहे. सदर आदेशान्वये संस्थेचे स्वयंघोषित अध्यक्ष श्री राजेंद्र चोपडा व संचालक मंडळ हे बरखास्त झाले असून त्यांच्यामार्फत केलेल्या अनागोंदी कारभारावर टाच येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. संस्थेच्या कार्यालयाचे बांधकाम स्वयंघोषित अध्यक्ष राजेंद्र चोपडा व संचालक मंडळ यांनी विना परवाना सुरू केलेले असून त्याबाबतही शहरातील व्यापाऱ्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू झालेली आहे. संस्थेच्या तांत्रिक दृष्ट्या अडचणींचा फायदा घेत स्वयंघोषित अध्यक्ष व संचालक मंडळ यांना सहाय्यक धर्मदाय आयुक्त यांनी चौकशीअंती घटना मंजूर करत मोठी चपराक लावली आहे.

संस्थेचे प्रथम विश्वस्त मंडळ म्हणून झुंबरलाल घेवरचंद बोथरा, अशोक रामलाल गांधी, प्रेमराज धनराज पितळे, संतोष कनकमल बोरा, शांतीलाल मोतीलाल गांधी, हस्तीमल मुथ्था, मनीष तलकसी सावला, दीपक ताराचंद बोथरा, गोपाल गंगाबिसन मिनियार, राजेंद्र पन्नालाल डागा, सुशील कुमार वसंतलाल भळगट, हिरालाल झुंबरलाल चोपडा, प्रकाश गोविंदराव सावंत, विश्वनाथ केदारनाथ कासट, अजित शांतीलाल भंडारी, सतीशलाल आनंदराम गुंदेचा, शैलेश पोपटलाल गांधी निवड करण्यात आली आहे.

सदर विश्वस्त मंडळाने सहा महिन्याच्या आत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची नेमणूक करून सर्वसाधारण सभेत सभासदांकडून मंजूर करून तशी नोंद धर्मदाय आयुक्त यांच्या कार्यालयात करून घ्यावी असा आदेश मेहेरबान सहाय्यक धर्मदाय आयुक्त सातव साहेब यांनी केला आहे. सहाय्यक धर्मदाय आयुक्त साहेबांच्या या निर्णयामुळे आडते बाजार व मार्केट यार्ड येथील व्यापारी वर्गा मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून व्यापारी वर्गाच्या वतीने एडवोकेट पांडुरंग बल्लाळ यांनी कामकाज पाहिल्याने त्यांचेही अभिनंदन होत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles