Saturday, May 18, 2024

कोरोना काळात ठप्प झालेल्या विकास कामांचा बॅकलॉग भरून काढणार लामखडे

कोरोना काळातील बॅकलॉग भरून काढणार
निंबळक गावच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील- सरपंच सौ. लामखडे
नगर तालुका- नगर तालुक्यातील निंबळक गावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्नशील असून त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन निंबळक गावच्या सरपंच सौ. प्रियंका लामखडे यांनी केले आहे.
निंबळक गाव नगर शहरालगत असून जवळच एम.आय.डी.सी. आहे. या गावाचा सर्वांगीण विकास करण्याचा संकल्प सरपंच सौ. प्रियंका अजय लामखडे यांनी केला आहे. गावच्या विकासासाठी सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी सहकार्य करावे अशी विनंती सरपंच सौ. लामखडे यांनी केली.
रस्ते, वीज, पाणी, आरोग्य तसेच इतर सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. गट-तट, राजकारण बाजूला ठेवून फक्त गाव विकासाची भूमिका डोळ्यासमोर ठेवून काम करण्यात येत असल्याची माहिती लामखडे यांनी दिली. कोरोना च्या काळात ठप्प झालेल्या विकासकामांचा फटका गावालाही बसला असून आता कोरोना काळातील बॅकलॉग भरून काढण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावा. गावच्या विकास कामात राजकारण न आणता गाव हिताचे निर्णय घेण्याची गरज आहे. गाव विकासासाठी ग्रामविकास अधिकारी सौ.सविता लांडे व सर्व खात्यांचे प्रशासकीय अधिकारी यांचे सहकार्य लाभत आहे.
गावातील जनतेने आमच्यावर दाखविलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही. राजकारण विरहित गाव विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहणार असल्याचे सरपंच सौ. प्रियंका लामखडे यांनी सांगितले. निंबळक गावाला एक कुटुंब समजून सर्व नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी सहकार्य करावे असे आवाहन सरपंच सौ. लामखडे यांनी केले आहे.

कोरोना काळातील बॅकलॉग भरून काढणार
कोरोना काळात ठप्प झालेल्या विकास कामांचा बॅकलॉग भरून काढण्यात येणार आहे. गाव विकासासाठी सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी राजकारण, गटतट बाजूला ठेवून एकजुटीने प्रयत्न करणे गरजेचे आहे.गावातील सर्व नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी ग्रामपंचायत कटिबद्ध आहे.
……सौ प्रियंका अजय लामखडे ( सरपंच निंबळक)

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles