Saturday, May 18, 2024

मोठी बातमी नगर जिल्ह्यातील मोठाअधिकारी ‘एसीबी’ च्या जाळ्यात

मोठी बातमी नगर जिल्ह्यातील बडा अधिकारी ‘एसीबी’ च्या जाळ्यात

तक्रारदार- पुरुष,वय-39, रा. ता.श्रीरामपूर जि.अहमदनगर.
आलोसे-
* श्री. रमेश अमृता बुधवंत, वय-57वर्षे, व्यवसाय नोकरी – राज्य कर अधिकारी(राजपत्रित,गट- ब) नेमणूक – वस्तू व सेवा कर भवन, अहमनगर. रा. खराडी, पुणे.
लाचेची मागणी- 50,000/-रू.
तडजोडी अंती लाचेची रक्कम – 35,000/- रू.
लाच स्विकारली- 20,000/-रू.
हस्तगत रक्कम- 20,000/-रू.
लाचेची मागणी – दि.23/02/2022
लाच स्विकारली- दि.23/02/2022
लाचेचे कारण -.
तक्रारदार यांचा मोबाईल फोन व इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे वितरणाचा व्यवसाय असून तक्रारदार यांच्या कडून त्यांचे व्यवसायातील उलाढाली संबंधाने विक्रीकर ताळेबंद सादर करताना काही त्रुटी आढळल्याने आलोसे यांनी तक्रारदार यांना वाढीव कर भरणा करण्याबाबत नोटीस अदा केली होती. सदरची नोटीस निरस्त करणे तसेच तक्रारदार यांचा VAT करापोटी परतावा मिळवून देण्याकरिता मदत करण्यासाठी आलोसे यांनी तक्रारदार यांचेकडे पंचासमक्ष 50,000/-रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती 35,000 रुपये रक्कम घेण्याचे ठरवून लाचेचा पहिला हप्ता रुपये 20,000/- लाचेची रक्कम त्यांचे कार्यालयात स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले म्हणून गुन्हा.
हॅश व्हॅल्यू घेण्यात आली असून फोटोग्राफ घेण्यात आले आहेत.
सापळा अधिकारी-
श्री.अभिषेक पाटील , पोलीस उप अधीक्षक, अँन्टी करप्शन ब्युरो,नाशिक.
सापळा पथक –
पो हवा सुकदेव मुरकुटे, पो ना मनोज पाटील, अँन्टी करप्शन ब्युरो,नाशिक.▶️ मार्गदर्शक-
1) मा.श्री.सुनील कडासने सो, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक
2) मा.श्री.एन.एस.न्याहळदे, साो., अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
3) मा.श्री. सतीश डी.भामरे, साो., वाचक पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
आरोपीचे सक्षम अधिकारी-
मा.आयुक्त , राज्य वस्तू व सेवा कर विभाग, म. रा. मुंबई.

सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी कींवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.
अँन्टी करप्शन ब्युरो,नाशिक.
@ टोल फ्रि क्रं. 1064

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles