Saturday, May 18, 2024

जिल्हा परिषदेसाठी इच्छुक वाढले…नगर तालुक्यातील ‘या’ गटात तगडी दावेदारी…

नगर – नगर तालुक्यातील जेऊर येथील रहिवासी दिनेश बेल्हेकर हे जेऊर जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असून त्यांनी त्यासाठी तयारी केल्याचे दिसून येत आहे.
दिनेश बेल्हेकर हे ग्रामपंचायत चे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत. यांच्या घराण्याचा आजोबा स्व. रामनाथ बेल्हेकर यांच्या काळापासून समाज सेवेत मोठा पुढाकार राहिलेला आहे. स्व. रामनाथ बेल्हेकर यांना मानणारा आजही जुन्या कार्यकर्त्यांचा मोठा वर्ग जेऊर गटात आहे.
तसेच वडील बबन बेल्हेकर हे सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असतात. त्यांच्या कार्याचा फायदा निश्चितच निवडणुकीत होईल असा कयास गटातील जनतेमध्ये आहे. स्वतः दिनेश बेल्हेकर यांचा कांद्याच्या व्यापारामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये घरगुती संबंध बनलेले आहेत. कांदा व्यापारी म्हणून बेल्हेकर हे घराघरात पोहोचलेले आहेत. त्यांचा गटात दांडगा जनसंपर्क असून तरुणांची मोठी फळी बेल्हेकर यांच्यासोबत आहे.
जेऊर जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गावात असलेला मित्र परिवार, नातेसंबंध, कांद्याच्या व्यापारामुळे शेतकऱ्यांची जुळलेले घनिष्ठ नाते तसेच सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रात नेहमीच मदत करणारे दिनेश बेल्हेकर यांच्यासाठी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी चांगले वातावरण आहे.
कोरोनाच्या काळात दिनेश बेल्हेकर यांनी गोरगरीब जनतेला मोफत किराणा वाटप केले होते. तसेच दिवाळीनिमित्त ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना किराणा वाटप करून समाजाप्रती असलेली तळमळ दाखवून दिली होती. कोरोनाच्या काळात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता केलेली सेवा पाहून बेल्हेकर यांनी आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार करून चांगले काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांच्या कार्याचे कौतुक केले होते.
दिनेश बेल्हेकर हे नेहमीच समाजसेवेत पुढाकार घेताना दिसून येत आहेत. गटातील विविध धार्मिक स्थळे, शाळा व इतर ठिकाणी आर्थिक मदत करून बेल्हेकर यांनी समाजाप्रती असलेली भावना जोपासली आहे. बेल्हेकर यांची जेऊर गटातील जनतेसमोर चांगली प्रतिमा म्हणून ओळख आहे.
दिनेश बेल्हेकर यांनी जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवावी असा आग्रह गटातील विविध गावातील तरूण कार्यकर्ते करत आहेत. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन पक्षश्रेष्ठींकडून त्यांना उमेदवारी मिळेल असा विश्वासही कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.

दिनेश बेल्हेकर यांचे आजोबा स्व. रामनाथ बेल्हेकर यांचा तालुक्यातील राजकारणात दबदबा होता. त्यांना मानणारा मोठा वर्ग आजही जेऊर गटांमध्ये सक्रिय राजकारणात आहे. त्यांच्या कार्याचा तसेच वडील बबन बेल्हेकर यांच्या सामाजिक, कार्यातील पुढाकार यांच्या पथ्यावर पडणार आहे. तसेच आजोबा व वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत दिनेश बेल्हेकर यांनी समाजसेवेचे व्रत अंगिकारले असल्याने या सर्व गोष्टींचा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत निश्चित फायदा होणार असल्याचे मत जाणकार व्यक्त करत आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles