Sunday, May 19, 2024

घरात पैसा टिकवून ठेवण्यासाठी ‘या’ वास्तू टिप्स नक्की वापरा

आपण पैसे कमावतो पण अचानक मोठा खर्च येतो आणि सर्व पैसे एकाच वेळी निघून जातात. पैसे मिळवूनही आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत आहे.

पण वास्तुशास्त्रातील काही बदल करुन तुम्ही यावर मात करु शकता.

पर्समध्ये क्रेडिट कार्ड : आजकाल बहुतेक लोक त्यांचे क्रेडिट कार्ड त्यांच्या पर्समध्ये ठेवतात. हे क्रेडिट कार्ड तुमचा खर्च वाढवते. त्यामुळे ते तुमच्याकडे ठेवू नका. मात्र, डेबिट कार्ड असण्यात काही नुकसान नाही. याशिवाय तुमच्या पर्समध्ये जुनी बिले वगैरे असतील किंवा अनावश्यक कागदपत्रे असतील तर तीही काढून टाका.

कर्ज: कर्ज घेतल्याने तुमचे आर्थिक संकट आणखी वाढते, त्यामुळे कर्ज घेण्याऐवजी तुमच्या खर्चावर मर्यादा घाला. जर कोणत्याही परिस्थितीत तुम्ही एखाद्याकडून कर्ज किंवा वैयक्तिक कर्ज घेतले असेल, तर सर्वप्रथम ते निकाली लावण्याच प्रयत्न करा.

घराच्या तिजोरीची दिशा : जर तुम्हाला तुमच्या घरात खूप पैसा हवा असेल तर तिजोरी किंवा कपाट ज्यामध्ये तुम्ही पैसे ठेवता ते अशा प्रकारे ठेवा की त्याचे तोंड उत्तर दिशेला खुले असेल. उत्तर दिशा ही कुबेराची दिशा मानली जाते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles