Monday, May 20, 2024

चिंचेतून आर्थिक समृद्धी साधणारे नगर तालुक्यातील अनोखं गाव..

चिंचेतून आर्थिक समृद्धी साधणारे नगर तालुक्यातील अनोखं गाव..
अहमदनगर जिल्ह्यातील सध्या मांडवे हे गाव चर्चेत आलंय ते त्या गावातील एक विशेष कारणाने. ते कारण म्हणजे गावत असणारी चिंच. होय.
मांडवे गावात प्रवेश करताच आपल्या ला दिसतात ती चिंचेची मोठाली झाडे. एक नाही दोन नाही तर तब्बल 150 झाडे या गावात 30 वर्षापूर्वी इथल्या लोकांनी लावलीत. या गावात ज्या ठिकाणी ही चिंचेची झाडे सध्या दिसत आहेत त्या ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले होते त्यामुळे त्यावेळच्या सरपंचांनी युक्ती लढवत चिंचेची झाडे लावली. आणि या चिंचेच्या झाडापासून लोकांना सावली आणि ग्रामपंचायतीला उत्पन्न सुरू होईल असं जुने जाणकार सांगतात.

सुमारे 1990 सालि त्यावेळच्या सरपंचांनी लावली . आता ही झाडे पाहिल्यावर चिंचा तोडण्याचा मोह आवरणार नाही. सध्या 115 झाडांना चिंचा आहेत. दरवर्षी या झाडांचा लिलाव होतो. 1 ते दीड लाख रुपये उत्पन्न या चींचे मूळे गावाला मिळतात. दरवर्षी हे उत्पन्न वाढत जाते . चिंचेच्या झाडांपासून मिळणारे हे उत्पन्न गावाच्या विकास कामात खर्च केली जातात.
सुभाष निमसे.

एकूणच चिंचेचा गोडवा हा खाणाऱ्याला जसा मिळतो तसाच या गावात 30 वर्षापूर्वी जुन्या लोकांना चिंचेची झाडे लावून परिसराला गारवा दिला आणि आर्थिक उत्पन्न देखील.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles