Sunday, May 19, 2024

डॉ. राजेंद्र धामणे यांना ‘प्राईड ऑफ अहमदनगर – २०२२’ सन्मान

प्राईड ऑफ अहमदनगर – २०२२
मा. डॉ. राजेंद्रजी धामणे
माऊली सेवा प्रतिष्ठान

घर आणि मन हरवलेल्या माणसांची
सेवा करणाऱ्या देवमाणसांना वंदन…!

संत तुकाराम महाराज यांनी अनेक शतकांपूर्वी म्हटले आहे की,
जे का रंजले गांजले। त्यासी म्हणजे जो आपुले।
तोचि साधु ओळखावा। देव तेथेचि जाणावा।

डॉ. राजेंद्रजी धामणे व डॉ.सुचेता धामणे यांचे कार्य अशाच समाजातील उपेक्षितांसाठी, वंचितांसाठी चालू आहे. मन व घर हरवलेल्या निराधार मनोविकलांग महिलांसाठी त्यांनी मनगाव उभारले. समाजाचाच एक भाग असलेल्या या मनोविकलांग महिलांनाही माणूस म्हणून जगण्याचा तितकाच हक्क आहे, या जाणीवेतून डॉ.धामणे यांनी मानवसेवेचे महान कार्य हाती घेतले. या कार्याची ख्याती देश विदेशात पोहचली आहे. सेवा किती निष्काम असावी याचे उदाहरण म्हणजे डॉ. राजेंद्र व सुचेता धामणे. त्यांच्या या कार्यामुळे संताची भूमी असलेल्या अहमदनगरची मान नेहमीच उंचावते. मानवता धर्म हाच खरा धर्म ही शिकवण समाजाला मिळते.

“दि व्यंकटेश ग्रुप” व “अहमदनगर स्टोरीज्” यांच्या वतीने आपल्या कार्याला सलाम करण्यासाठी
“प्राईड ऑफ अहमदनगर – 2022” हा सन्मान देताना आम्हाला विशेष आनंद होत आहे.

आपले कार्य उल्लेखनीय, प्रेरणादायी आणि अभिमानास्पद आहे.
आम्ही आपणांस सन्मानपूर्वक वंदन करतो.

स्नेहांकित –
अभिनाथ शिंदे
(संस्थापक, चेअरमन, दि व्यंकटेश ग्रुप)
आर्टिस्ट ज्ञानेश शिंदे
(अहमदनगर स्टोरीज् , डिझाईन अ‍ॅडिक्ट)
कृष्णा मसुरे , अनिल गुंजाळ,
छायाचित्रकार संजय दळवी,
ज्ञानेश्वर झाम्बरे व संपूर्ण टीम

विशेष टीप –
अहमदनगरमधील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत योगदान देणार्‍या व अहमदनगरचा अभिमान असणाऱ्या
व्यक्तिमत्त्वांचा सन्मान “दि व्यंकटेश ग्रुप” व “अहमदनगर स्टोरीज्” यांच्या वतीने दर आठवड्याला केला जाणार आहे. “प्राईड ऑफ अहमदनगर” हा कृतज्ञता उपक्रम डिसेंबर 2022 पर्यंत सुरु असणार आहे. नगर जिल्ह्यात जे लोक चांगलं आणि समाजाभिमुख काम करत आहेत, त्यांचा सन्मान करणे आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेणे, हा यामागील उद्देश आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles