Sunday, May 19, 2024

तेलंगणाचे मुख्यमंत्री व उद्धव ठाकरेंची भेट, तेजस ठाकरेंची उपस्थिती चर्चेत

मुंबईः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सह केंद्र सरकारवर टीका करून भाजप विरोधी देशव्यापी आघाडीसाठी पुढाकार घेणारे तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर अर्थातच के. चंद्रशेखर राव यांनी आज दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईत घेतली. विशेष म्हणजे यावेळी तेजस ठाकरे यांची उपस्थिती होती. सध्या ‘केसीआर’ तिसऱ्या आघाडीची स्थापना करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जातेय. केंद्रातल्या भाजप सरकारविरोधात वेगवेगळ्या राजकीय पक्षांची मोट बांधण्याचे संकेत नुकतेच ‘केसीआर’ यांनी दिले होते. यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेण्याचा मनोदयही व्यक्त केला होता. या साऱ्या पार्श्वभूमीवर ‘केसीआर’ यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles