Sunday, May 19, 2024

देवेंद्रजी अतिशय उत्तम डोसा बनवतात…त्यांच्याकडून आवर्जून बनवून घ्यायचे…

झी मराठीवर ‘किचन कल्लाकार’ या शोला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी हजेरी लावली. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजेरी लावली .

शोचा सूत्रसंचालक संकर्षण कऱ्हाडेने देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारतो की “तुम्हाला किचनमध्ये जाऊन काही बनवायला आवडतं का?” यावर उत्तर देत देवेंद्र फडणवीस बोलतात, की “मला अनेक गोष्टी बनवायला आवडतात. अलीकडेच्या काळात किचनमध्ये जाणं होतं नाही. पण माझा हा दावा आहे की जगातला सर्वात उत्तम चहा मला बनवता येतो डोसा, पोहे, अंडा करी, ऑमलेट असे अनेक पदार्थ मला चांगले बनवता येतात.” यावर संकर्षण अमृता फडणवीस यांना विचारतो की, “ते म्हणाले त्यांना चहा, पोहे, डोसा, अंडा करी, ऑमलेट चांगलं बनवता येतं, तर तुम्हाला त्यांच्या हातचा कोणता पदार्थ आवडतो?” यावर उत्तर देत अमृता बोलतात की “मला त्यांच्या हातचा डोसा प्रचंड आवडतो. एकदम क्रिस्प डोसा, त्याच्यासोबत बटाटाच्या भाजी आणि सांबारपण अप्रतिम बनवतात. तर आधी दरवेळी जेव्हा आमची बाई यायची नाही तेव्हा मी देवेंद्रजींकडून डोसा बनवून घ्यायचे.”

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles