धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादीत घेणं आत्मघातकी ठरलं… बड्या नेत्याचे मोठं वक्तव्य…

0
95

पंधरा वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात धनंजय मुंडे यांना घेणे, हा आमचा आत्मघातकी प्लॅन होता, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे.

धनंजय मुंडे यांना पाठवून अजित पवारांना भाजपमध्ये आणण्याचा प्लॅन भाजप आणि आरएसएसचा होता का? असे विचारले असता जयंत पाटील म्हणाले की, गोपीनाथ मुंडे साहेबांनी भाजप सध्या जे राजकारण करत आहे, असे राजकारण कधीच केले नाही. तो आमचाच आत्मघातकी आमचा प्लॅन होता, असे जयंत पाटील यांनी म्हटले. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाची चर्चा पुन्हा एकदा रंगली असून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.