Monday, May 20, 2024

मंत्री असताना त्या स्वतःला परळीच्या मालक समजायच्या, धनंजय मुंडे यांचा पंकजा मुंडेंवर निशाणा

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी पुन्हा एकदा माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या वर निशाणा साधला आहे. पुणे जिल्ह्यातील कार्यक्रमात बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, विधान परिषदेचा विरोधी पक्षनेता म्हणून तत्कालीन फडणवीस सरकारकडून मला वेगवेगळ्या विभागाचा निधी मिळायचा. तो मी परळीला नेला नाही, तर तो सर्व निधी मी दत्तात्रेय भरणे यांना द्यायचो. तो निधी मी परळीला नेला असता. मात्र, तेव्हाचे तेथील जे मंत्री होते. ते स्वतःला परळीचे मालक समजत होते. विरोधी पक्षनेत्याचा निधी म्हणून मला तो देऊ दिला नसता. मीही जाऊद्या म्हटलं आणि तो निधी फक्त दत्तामामा भरणे यांना दिला, अशा शब्दांत सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles