Tuesday, May 21, 2024

मनसे अध्यक्ष राज ठाकरे होणार ‘आजोबा’

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कुटुंबातून एक गोड बातमी आली आहे. राज ठाकरे हे लवकर आजोबा होणार आहेत. राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे आणि मिताली ठाकरे यांच्याकडे गोड बातमी असल्याचं वृत्त आहे. काही दिवसांपूर्वीच अमित ठाकरे यांच्याकडे मनसेच्या विद्यार्थी सेनेची जबाबदारी सोपवण्यात आली होती. आता अशातच त्यांच्या खासगी आयुष्यातीलही गोड बातमी समोर आली आहे.

राज ठाकरे यांच्या नव्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी आनंदाचं वातावरण आहे. नुकतेच राज ठाकरे हे आपल्या कुटुंबीयांसह कृष्णकुंजवरून शिवतीर्थ या आपल्या नव्या निवासस्थानी वास्तव्यास गेले आहेत. मिताली ठाकरे आणि अमित ठाकरे आता आई-बाबा होणार असल्यानं ठाकरे कुटुंबात उत्साहाचं वातावरण आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles