Monday, May 20, 2024

राज्य टंकलेखन लघुलेखन शासनमान्य संस्था संघटनेचे अध्यक्ष प्रकाश कराळे यांना मातृशोक

: महाराष्ट्र राज्य टंकलेखन लघुलेखन शासनमान्य संस्थांची संघटना संघटनेचे अध्यक्ष प्रकाश कराळे यांना मातृशोक आदर्श माता सौ. हिराबाई भिमराज कराळे यांचे दुःखद निधन….
नगर : मौजे कापूरवाडी तालुका नगर येथील प्रगतशील शेतकरी कुटुंबातील सौ हिराबाई भिमराज कराळे यांचे सोमवार दिनांक 21 फेब्रुवारी रोजी अल्पशा आजाराने निधन झाले महाराष्ट्र राज्य टंकलेखन संघटनेचे अध्यक्ष व मराठा पतसंस्थेचे संस्थापक मानद सचिव प्रकाश कराळे यांच्या त्या मातोश्री होत्या अत्यंत मनमिळावू स्वभाव व धार्मिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या सौ. हिराबाई कराळे या सारसनगर व सर्व कापूरवाडी परिसरात नाणी आणि आजी नावाने प्रसिद्ध होत्या पुणे येथील विश्वमाता फाउंडेशन च्या वतीने 2013ला स्वर्गीय हिराबाई कराळे यांना आदर्श माता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते बालगंधर्व येथे त्यांना आदर्श माता पुरस्कार डॉक्टर संचेती व मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला होता .सोमवारी सायंकाळी 5.00 वाजता कापूरवाडी दत्तवाडी मळा बत्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी कापूरवाडी गावचे ग्रामस्थ, नातेवाईक ,अनेक संस्थांचे व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी जिल्हा मजूर फेडरेशनचे अध्यक्ष अर्जुनराव बोरुडे, संचालक उत्तमराव घोगरे पाटील संचालक दादासाहेब जगताप जिल्हा बँकेचे संचालक प्रशांतराव गायकवाड अहमदनगर महानगरपालिकेचे नगरसेवक प्रकाश भागानगरे ,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष अभिजीत खोसे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हा अध्यक्ष माणिकराव विधाते, सोनई येथील बी एम दरंदले, प्राचार्य रवींद्र चौभे, राज्य टंकलेखन संघटनेचे महासचिव हेमंत ढमढेरे, कोषाध्यक्ष सुभाष बागड ,राष्ट्रवादीचे युवा नेते अध्यक्ष रोहिदास कर्डिले, मराठा पतसंस्थेचे माजी चेअरमन इंजि.बबनराव खिलारी व कापूरवाडी गावचे सरपंच संभाजी भगत यांनी श्रद्धांजली अर्पण केली हिराबाई कराळे प्राचार्य प्रकाश कराळे यांच्या मातोश्री व अहमदनगर शहर वकील संघटनेचे माजी अध्यक्ष शेखर देवराव दरंदले पाटील व पंडित दीनदयाळ नागरी पतसंस्थेचे मॅनेजर निलेश लाटे यांच्या सासू होत त्यांच्यामागे त्यांच्या मागे पती दोन मुले दोन मुली दोन सुना नातवंडे व दीर भाये त्यांची मुले नातवंडे असा मोठा परिवार कापूरवाडी व सारसनागर येथे वास्तव्य करत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles