Thursday, May 16, 2024

वास्तूशास्त्र…घरात ‘चांदीचा कासव’ ठेवण्याचे अचंबित करणारे फायदे

वास्तूशास्त्रात अशा काही गोष्टींचा उल्लेख केला गेला आहे की ज्यांचं पालन केल्यानं घरातील आर्थिक स्थिती सुधारता येऊ शकते. वास्तूशास्त्रातील नियमांचं तंतोतंत पालन केलं गेलं तर घरात कधीच पैशाची कमतरता भासणार नाही.

*वास्तूनुसार घराची मांडणी करण्यासोबतच अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या बाहेरून आणून घरात ठेवणे खूप शुभ मानले जाते. यापैकी एक म्हणजे चांदीचा कासव. वास्तूशास्त्रातील नियमानुसार एक चांदीचा कासव घरात ठेवला तर कधीच पैशाची कमतरता जाणवत नाही आणि शारीरिक समस्याही दूर राहतात.

*घरात पैशांची कमतरता यांसारख्या गंभीर परिस्थितीचा सामना करत असाल तर चांदीचा कासव घरात नक्की ठेवावा. वास्तूनुसार उत्तर दिशेला कासव ठेवणे शुभ मानले जाते. यासाठी काचेचे भांडे घ्या आणि त्यात थोडे पाणी टाका. आता त्यात कासव टाका. तुम्ही पाण्याशिवाय रिकाम्या काचेच्या भांड्यातही चांदीचे कासव ठेवू शकता. यामुळे पैशाची कमतरता दूर होईल आणि पैसे कमावण्याचे नवे मार्गही सापडतील.

*ज्यांना व्यवसायात नुकसान होत आहे त्यांनी चांदीचा कासव नक्कीच व्यापाराच्या वास्तूमध्ये म्हणजेच कार्यालयात किंवा घरात ठेवावा किंवा चांदीच्या कासवाची अंगठी देखील घालू शकतात. ज्योतिष शास्त्रानुसार, कासव बहुतांशवेळ पाण्यात राहतो आणि या कारणास्तव ते लक्ष्मी मातेशी संबंधित असल्याचे मानले जाते. कासवाची अंगठी घालण्यापूर्वी ती कच्च्या दुधात ठेवावी आणि पूजेनंतरच घालावी.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles