Thursday, May 16, 2024

नगरमधील हॉस्पिटलमध्ये महिनाभर मोफत आरोग्य तपासणी शिबिरे, तज्ज्ञ डॉक्टर, सवलतीत उपचार

अँजिओग्राफी 3 हजार, सिटी स्कॅन 1250 रुपयांत, एमआरआय 2500 रुपयात व सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया
अहमदनगर : राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज यांच्या 29 व्या पुण्यस्मृतीदिनानिमित्त जैन सोशल फेडरेशन संचलित श्री आनंदऋषीजी हॉस्पिटल ऍण्ड हार्ट सर्जरी सेंटर येथे दि.3 मार्च ते दि. 31 मार्च 2022 या कालावधीत विविध मोफत आरोेग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज यांची मानवसेवेची शिकवण व प्रबुध्द विचारक प.पू.आदर्शऋषीजी म.सा.यांच्या प्रेरणेतून हे शिबिर घेण्यात येत आहेत. दररोज सकाळी 10 ते दुपारी 2 या कालावधीत रूग्ण तपासणी करण्यात येणार आहे. दरवर्षी राबविण्यात येणार्‍या या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ असंख्य रूग्णांना झाला आहे. आनंदऋषीजी हॉस्पिटलला एन.ए.बी.एच.मान्यता मिळालेली असून ही मान्यता असलेले नगर जिल्ह्यातील 250 बेडस्‌चे हे पहिलेच हॉस्पिटल आहे. हॉस्पिटलमधील उच्च दर्जाच्या आरोग्य सेवांचा लाभ या मोफत शिबिरांतून सर्वसामान्य रूग्णांना होणार आहे.हॉस्पिटलमध्ये एमआरआय तपासणी 2500 रुपये, सर्व प्रकारचे सिटी स्कॅन 1250 रुपये, सीटी अँजिओग्राफी 1500 रुपये, सोनोग्राफी कलर प्रिंट व रिपोर्टसह 600 रुपये, डिजीटल एक्स रे तपासणी 250 रुपयात केली जाणार आहे. हॉस्पिटलमध्ये प्रशस्त व अतिप्रगत पॅथॉलॉजी विभाग, आंतरराष्ट्रीय दर्जाची ब्लड बँक, 25 डायलेसिस मशिन कक्ष, परिपूर्ण फिजिओथेरपी विभाग आहे.
या भव्य विविध मोफत आरोग्य तपासणी शिबिराला गुरुवार दि.3 मार्च रोजी सुरूवात होणार आहे. पहिल्या दिवशी प्लॅस्टिक सर्जरी शिबीर होणार आहे. यात लहान मुलांच्या हाताच्या जन्मजात समस्या, व्यंग, मधुमेहामुळे होणार्‍या जुनाट जखमा, पायाच्या जखमा, दुभंगलेले ओठ, तुटलेले कान, चेहर्‍यावरील व्रण आदी समस्यांवर उपचार करण्यात येतील. प्लॅस्टिक सर्जन डा.माया मरकड शिबिरात तपासणी व उपचार करणार आहेत.
शनिवार दि.5 मार्च रोजी किडनी आजार तपासणी शिबिर होणार आहे. यात अंगावर सूज येणे, लघवी कमी अथवा लाल होणे, किडनी जंतू संसर्ग, डायलेसिस रूग्णांची तपासणी व मार्गदर्शन केले जाणार आहे. महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत डायलेसिस मोफत केले जाईल. यात नेफ्रोलॉजीस्ट डॉ.सुहास बावीकर, डॉ.गोविंद कासट, डॉ.जयप्रकाश शिरपूरवार रूग्ण तपासणी करतील.
रविवार दि.6 मार्च रोजी मोफत नेत्र रीग तपासणी शिबीर होणार आहे. महावीर भवन येथील आनंदऋषीजी नेत्रालय येथे होणार्‍या या शिबिरात मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया, रेटिना तपासणी व शस्त्रक्रिया, तिरळेपणा, लहान मुलांचे मोतीबिंदू तपासणी होईल. महात्मा फुले जनआरोग्य योजनेतर्ंगत येणार्‍या शस्त्रक्रिया मोफत केल्या जातील. नेत्रतज्ज्ञ डॉ.प्रकाश कांकरिया, डॉ.अशोक महाडिक, डॉ.संदीप राणे, डॉ.विशाल तांबे, डॉ.कौस्तुभ घोडके, डॉ.नेहा भराडिया, डॉ.किरण शिंदे, डॉ. आदित्य नाकाडे रूग्ण तपासणी व उपचार करतील.
सोमवार दि.7 मार्च रोजी हर्निया, हायड्रोसील व इतर जनरल शस्त्रक्रिया शिबीर होणार आहे. यात सवलतीच्या दरात जनरल शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. ऍपेंडिक्स, हर्निया शस्त्रक्रिया 6 हजार रुपयांत तर हायड्रोसील शस्त्रक्रिया 4000 रुपयात केली जाईल. 31 मार्चपर्यंत या शस्त्रक्रिया शिबिराचा लाभ रूग्णांना घेता येईल. या शिबिरात डॉ.विवेक भापकर, डॉ.प्रविण मुनोत, डॉ.भास्कर जाधव उपचार करणार आहेत.
दि. 9 ते 31 मार्च या कालावधीत दुर्बिणीव्दारे शस्त्रक्रिया (बिनटाका) शिबीर होणार आहे. यात लॅप्रोस्कोपीव्दारे पोटातील, बेंबी, हर्नियाची शस्त्रक्रिया 10 हजार रुपये, पित्ताशय काढणे शस्त्रक्रिया 12 हजार रुपये, स्त्रियांच्या गर्भाशयाची पिशवी काढणे 10 हजार रुपये, स्टॅपलर लेझर पाईल्स शस्त्रक्रिया 15 हजार रुपये, अपेंडिक्स शस्त्रक्रिया 4 हजार रुपये, स्त्रीयांचे वंध्यत्व तपासणीसाठी ट्युबल पेटेन्सी टेस्ट 2 हजार रुपये, स्त्रीयांची कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया 3 हजार रुपयांत केली जाईल. या शस्त्रक्रियांसाठी औषधे, जाळीचा व इतर खर्च वेगळा असेल. या शिबिरात लॅप्रोस्क्रोपिक सर्जन डॉ.भास्कर जाधव, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.रवींद्र मुथा, डॉ.सोनल बोरुडे रूग्ण तपासणी करतील.
शुक्रवार दि.11 मार्च रोजी स्त्रीरोग, गर्भवती महिला आरोग्य तपासणी शिबीर होणार आहे. यात दुर्बिणीव्दारे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, गर्भाशयाची पिशवी काढण्याची शस्त्रक्रिया, सिझेरियन प्रत्येकी 10 हजार रुपयात केले जाईल. गर्भवती मातांची सोनोग्राफी, रक्त, लघवी इत्यादी तपासण्या शिबिरापासून पुढील महिनाभराच्या कालावधीत 50 टक्के सवलतीच्या दरात केल्या जातील. शिबिरातील गर्भवती मातांना बाळंतपणावेळी होणार्‍या फीमध्ये 50 टक्के सवलत देण्यात येणार आहे. या शिबिरात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.रवींद्र मुथा, डॉ.सोनल बोरुडे रूग्ण तपासणी करतील.
रविवार दि.13 मार्च रोजी हृदयरोग तपासणी शिबीर होणार आहे. यात ऍन्जिओग्राफी तपासणी 3 हजार रुपयांत केली जाणार आहे. तपासणीनंतर ऍन्जिओप्लास्टी, बायपास करण्याची गरज पडली तर ऍन्जिओग्राफीचे 3 हजार रुपये परत केले जातील. हृदय शस्त्रक्रिया हृदयातील झडप बदलणे, छिद्रे बुजवणे, लहान मुलांच्या हृदयशस्त्रक्रिया व अँजिओप्लास्टी महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत मोफत केल्या जाणार आहेत. शिबिरात कार्डियाक सर्जन डॉ.स्वप्नील कर्णे, डॉ.श्रीरंग रानडे, डॉ.वसंत कटारिया, कार्डिओलॉजीस्ट डॉ.राहुल अग्रवाल, डॉ.अमित थोपटे, कार्डियाक अनेस्थेटिस्ट डॉ.राहुल एरंडे, डॉ.विनय छल्लाणी, डॉ.प्रवीण डुंगरवाल, डॉ.गजेंद्र गिरी, डॉ.रविराज गवळी, डॉ.जयप्रकाश शिरपूरवार रूग्ण तपासणी करतील.
सोमवार दि.14 मार्च रोजी त्वचा रोग तपासणी शिबीर होणार आहे. मुरुम, पांढरे डाग, इसब, गजकर्ण, नायटा, केसांच्या, नखांच्या समस्या, सोरियासीस, चामखीळ, कुष्ठरोगावरील तपासणी व उपचार करण्यात येतील. त्वचारोग तज्ज्ञ डॉ.भास्कर पालवे, डॉ.प्राची घुगे रूग्णांची तपासणी व मार्गदर्शन करतील.
मंगळवार दि.15 मार्च रोजी दंतरोग तपासणी व उपचार शिबीर होणार आहे. यात दातांच्या नसावरील उपचार मेटल कॅप एक हजार रुपये, सिरॅमिक कॅप 1500 रुपये, रुट कॅनल 1600 रुपये, दातांची कवळी बसवणे 7 ते 14 हजार दरम्यान, दात साफ करणे , दातात सिमेंट भरणे प्रत्येकी 400 रुपये, दात काढणे आदी उपचार केले जाणार आहेत. दंतरोग तज्ज्ञ डॉ.ऐश्वर्या पाटील व मुलांचे दंतरोग तज्ज्ञ डॉ.प्रणव डुंगरवाल या शिबीरात उपचार करतील.
गुरुवार दि.17 मार्च रोजी बालरोग तपासणी शिबीर होणार आहे. यात बालरोग तज्ज्ञ डॉ.वैभवी वंजारे, डॉ.सोनाली कणसे रूग्ण तपासणी करतील.
शुक्रवार दि.18 मार्च रोजी प्रोस्टेट ग्रंथी, मुतखडा, लघवीचे विकार तपासणी व उपचार शिबीर होणार आहे. यात मूत्रविकार शल्यचिकित्सक डॉ.नीरज गांधी तपासणी करतील.
मंगळवार दि.22 मार्च रोजी न्यूरोलॉजी तपासणी शिबीर होईल. यात डोकेदुखी, अपस्मार, पॅरालिसिस, कंबरदुखी, नसांचे विकार, स्नायूंचे विकार, मेंदूतील जंतुसंसर्ग, मेंदूज्वर, स्मृतीभ्रंश इत्यादी आजारांची तपासणी व उपचार केले जातील. ईईजी, ईएमजी तपासण्या 50 टक्के सवलतीच्या दरात केल्या जाणार आहेत. मेंदूविकार तज्ज्ञ डॉ.गौतम काळे, न्यूरोसर्जन डॉ.अनिरुध्द पाटील रूग्ण तपासणी करतील.
बुधवार दि.23 मार्च रोजी मधुमेह व उच्च रक्तदाब तपासणी शिबीर होईल. मधुमेह, थायरॉईड, ग्रंथीविकार संबंधित आजार तपासणी शिबीर होईल. यात कमी, जास्त रक्तदाब, जाडपणा, लवकर वयात येणे, वयात उशिरा येणे, मुलांमधील कमी उंची, पाळीतील अनियमितता, चेहर्‍यावरील अनावश्यक केस, थायरॉईड आजार, रजोनिवृत्तीच्या समस्या, लहान मुलांमधील मधुमेह, वयोवृध्दामधील हार्मोन्स समस्या, पुरुष वंध्यत्त्व आदी समस्यांवर उपचार होतील. शिबिरात डॉ.वसंत कटारिया, डॉ.जयप्रकाश शिरपूरवार, डॉ.प्रवीण डुंगरवाल, डॉ.गजेंद्र गिरी, डॉ.रविराज गवळी उपचार मार्गदर्शन करतील.
गुरुवार दि.24 मार्च कॅन्सर तपासणी शिबीर होणार आहे. यात घसा, फुफ्फुस, आतडे, तोंडाचा इत्यादी कॅन्सर तपासणी, स्त्रियांचे कॅन्सर तपासणी, स्त्रियांमधील स्तनाच्या कॅन्सरची तपासणी मॅमोग्राफी मशिनव्दारे करण्यात येईल. स्त्रियांच्या गर्भ पिशवीच्या कॅन्सरच्या तपासणीसाठी सवलतीच्या दरात पॅपस्मीयर तपासणी केली जाणार आहे. मॅमोग्राफी तपासणी फक्त 100 रुपयात करण्यात येणार आहे. आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारचे केमोथेरपी उपचार मोफत उपलब्ध आहेत. या शिबिरात कॅन्सर सर्जन डॉ.विनायक शेंडगेे, कॅन्सर फिजिशियन डॉ.मंगेश कोरडे, डॉ.सतिष सोनवणे, कॅन्सर सर्जन डॉ.विवेक भापकर, डॉ.प्रविण मुनोत, लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉ.भास्कर जाधव, कॅन्सर विकार तज्ज्ञ डॉ.अमित भट्ट, डॉ.अनंतभूषण रानडे, डॉ.लिझा बलसारा, स्त्री रोग तज्ज्ञ डॉ.रवींद्र मुथा, डॉ.सोनल बोरुडे, रेडिओलॉजीस्ट डॉ. मितेश कटारिया, डॉ.भक्ती फलके, डॉ.सोनाली सोलट, डॉ.निखिता जैन (कटारिया), पॅथॉलॉजी डॉ.मुकुंद उंडे, डॉ.सारिका झरेकर, मायक्रोबायोलॉजीस्ट डॉ.नरेंद्र पाटील रूग्ण तपासणी व मार्गदर्शन करणार आहेत.
शुक्रवार दि.25 मार्च रोजी कान, नाक, घसा व स्पीच थेरपी तपासणी शिबीर होणार आहे. या शिबिरात डॉ.सुकेशिनी गाडेकर रूग्ण तपासणी करणार आहेत. रविवार दि.27 मार्च रोजी पोटाचे आजार, यकृताचे (लिव्हर) व स्वादुपिंडाचे आजार, कॅन्सर निदान व उपचार करण्यात येतील. शिबिरात गॅस्ट्रो स्कोपी 1500 रुपये, कोलोनोस्कोपी 3 हजार रुपयांत केली जाणार आहे. हॉस्पिटलमध्ये नगरमध्ये प्रथमच हायड्रोजन ब्रेथ टेस्ट व हाय रिझोल्युशन मॅनोमेट्रोची सोय सवलतीच्या दरात करण्यात आली आहे. डॉ.राजेंद्र गुंजाळ या शिबिरात रूग्ण तपासणी करणार आहेत.
गुरुवार दि.31 मार्च रोजी अस्थिरोग तपासणी, मणके व सांधेबदली शस्त्रक्रिया शिबीर होणार आहे. यात इंपोर्टेड इम्प्लांटसह संपूर्ण गुडघा प्रत्यारोपण, संपूर्ण खुबा प्रत्यारोपण इंपोर्टेड इम्प्लांटसह 65 हजार रुपयांपुढे केले जाणार आहे. औषध खर्च वेगळा असणार आहे. यासह ए.सी.एल., रि कन्स्ट्रक्शन व ऑर्थोस्कोपी निदान केले जाणार आहे. महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजनोंतर्गत पात्र लाभार्थींच्या शस्त्रक्रिया मोफत केल्या जातील. शिबिरात अस्थिरोग तज्ज्ञ डॉ.विशाल शिंदे तपासणी करणार आहेत.
या शिबिराची नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी 0241-2320473/74/75 या दूरध्वनी क्रमांकावर अथवा 9404399911 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन जैन सोशल फेडरेशनतर्फे करण्यात आले आहे. रूग्ण व रूग्णांच्या नातेवाईकांकरिता हॉस्पिटल शेजारील महावीर भवन येथे फक्त 35 रुपयांत भोजनाची व्यवस्था कार्यरत आहे. तसेच 24 तास आनंदऋषीजी ब्लड बँक कार्यरत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles