Friday, May 17, 2024

‘या’ गवताची लागवड देईल बक्कळ कमाई, एकदा लागवडीनंतर 7 वर्षे घोर नाही

अरोमा मिशन अंतर्गत सुगंधी वनस्पतींच्या लागवडीला प्रोत्साहन दिले जात आहे. यांपैकी एक म्हणजे लेमनग्रासची लागवड. सर्वात महत्वाचे म्हणजे लेमनग्रासची लागवड दुष्काळी भागांतही केली जाऊ शकते.
लेमनग्रासच्या पानांचावापर परफ्यूम, साबन, निरमा, डिटर्जंट, तेल, केसांचे तेल, मच्छर लोशन, डोकेदुखीचे औषध आणि कॉस्मेटिक्स तयार करताना केला जातो. ही प्रोडक्ट्स lemongras productsतयार करणाऱ्या कंपन्यांमध्ये या वनस्पतीच्या तेलाची प्रचंड मागणी आहे.

एका अंदाजानुसार, भारतात दरवर्षी सुमारे 700 टन लेमन ग्रास तेलाचे उत्पादन होते. हे तेल परदेशातही निर्यात केले जाते. यामुळे या वनस्पतीची लागवड करून लाखो रुपये नफा कमावण्याची संधी शेतकऱ्यांना आहे.

लेमनग्रासची लागवड अगदी नापीक जमिनीतही केली जाऊ शकते. विषेश म्हणजे याच्या लागवडीचा खर्चही फार नाही. शेणखत, लाकडाची राख आणि 8-9 पाण्यातही ही वनस्पती चांगल्या प्रकारे येते.एकवेळ याची लागवड केल्यानंतर 6 ते 7 वर्षांपर्यंत आपण हे पीक घेऊ शकता आणि दरवर्षीच्या पेरणीपासून मुक्त होऊ शकता.शेतकरी दर तीन महिन्यांला या वनस्पतीच्या पानांची कापणी करू शकतो आणि वर्षभर चांगला नफा मिळवू शकतो.
विशेष म्हणजे लेमनग्रासची शेती वर्षात केव्हाही केली जाऊ शकते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles