Monday, May 20, 2024

सकाळी रिकाम्या पोटी ‘या’ गोष्टी टाळा..नाही तर आरोग्य बिघडेल

रिकाम्या पोटी काही गोष्टी खाल्ल्याने शरीरासाठी घातक ठरु शकते. तुमचे आरोग्य बिघडू शकते.

*जर तुम्ही सकाळी उठल्याबरोबर रिकाम्या पोटी कॉफी प्यायली तर तुमच्या पोटात आम्लपित्त तयार होईल आणि याचे कारण म्हणजे कॉफीमध्ये असलेला एक घटक ज्यामुळे शरीरातील हायड्रोक्लोरिक ऍसिड वाढवते.

*रिकाम्या पोटी चिंगम चघळणे चांगले नाही. चघळणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे त्यामुळे जेव्हा एखादी व्यक्ती चघळायला लागते तेव्हा आपल्या पोटात पाचक ऍसिड तयार होण्यास सुरुवात होते. रिकाम्या पोटी या पाचक ऍसिडमुळे ऍसिडिटीपासून अल्सरपर्यंत अनेक समस्या उद्भवू शकतात, त्यामुळे रिकाम्या पोटी च्युइंगम चघळल्यासारखे वागणे चांगले नाही.

*जर तुमच्या पोटात अन्न नसेल आणि तुम्ही रिकाम्या पोटी दारू पीत असाल तर दारू थेट तुमच्या रक्तप्रवाहात जाते. अल्कोहोल थेट रक्तप्रवाहात पोहोचले की ते लगेचच रक्तवाहिन्या आणि संपूर्ण शरीरात पसरते. त्यामुळे आपल्याला लगेचच झटका बसल्याप्रमाणे होऊन शरीरामध्ये उष्णता जाणवते. त्यामुळे आपल्या नाडीचा वेग कमी होतो. तो आपल्या पोटातून मूत्रपिंड, फुफ्फुस, यकृत आणि नंतर मेंदूपर्यंत पोहोचतो. हे होण्यास फार कमी वेळ पुरेसा ठरतो. हे तुमच्या शरीरासाठी घाक ठरु शकते. पोट भरलेले राहिल्यास अल्कोहोल रक्तप्रवाहात वेगाने पोहोचत नाही त्यामुळे रिकाम्या पोटी दारु पिणे घातक ठरु शकते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles