सोलापूरचे नवनियुक्त पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे प्रथमच रविवारी रात्री सोलापुरात आले. स शासकीय विश्रामगृहात त्यांच्या अंगावर निळी शाई फेकण्यात आली. या घटनेमुळे तेथे गोंधळ उडाला होता . शासकीय नोकरभरतीचे खासगीकरण करण्याच्या धोरणाच्या निषेधार्थ एका संघटनेच्या कार्यकर्त्याने पाटील यांच्या अंगावर निळी शाई फेकल्याची माहिती समोर आली.
पोलिसांनी अजय मैंदर्गीकर नावाच्या तरूणाला जागेवर ताब्यात घेतले. या घटनेमुळे शासकीय विश्रामगृह परिसरात तणावाचे वातावरण पसरले होते. गेल्या महिन्यात याच शासकीय विश्रामगृहात तत्कालीन पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना धनगर आरक्षण कृती समितीचा समन्वयक यांच्या अंगावर शेखर बंगाळे याने धनगर आरक्षण प्रश्नावर लक्ष वेधत निवेदन देताना त्यांच्या डोक्यावर भंडारा उधळला होता.