या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला चिमुकले वारकरी दिसतील आणि ते भजन गीत गात आणि टाळ वाजवत थिरकताना दिसत आहे. चिमुकल्या वारकऱ्यांचे हे नृत्य पाहून तुम्हीही थक्क व्हाल. चिमुकल्यांनी धोतर, बंडी घातली आहे. डोक्यावर पांढरी टोपी घातली आहे आणि अतिशय जल्लोषाने ते भजन गीतावर नृत्य सादर करत आहे. त्यांच्यातील जोश पाहून तुम्हालाही ऊर्जा येईल. या लहान मुलांवर झालेले हे सुंदर संस्कार कौतुकास्पद आहे. या व्हिडीओवर लिहिलेय, “संस्कार याच वयात होतात”






