अयोध्येतील राम मंदिर सोहळ्याकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे. या सोहळ्यासाठी देशभरातील हजारो प्रतिष्ठित व्यक्तींना निमंत्रण मिळालं आहे. या सोहळ्याचे निमंत्रण जवळपास सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुखांना मिळालं आहे. त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही निमंत्रण मिळालं आहे. मात्र, अयोध्येतील मंदिर लोकार्पणाच्या सोहळ्याला मुख्यमंत्री शिंदे जाणार नसल्याची माहिती हाती आली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनीमुख्यमंत्री ‘एक्स’ अकाऊंटवर पोस्ट करत माहिती दिली आहे.
जय श्री राम…
अयोध्येत राम मंदीर उभारणीचे कोट्यवधी भारतीय आणि रामभक्त तसेच हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदीजी यांनी साकार केलं आहे. मोदीजींचे शतशः आभार…
अयोध्येमध्ये सोमवारी श्री प्रभू रामचंद्र यांच्या मूर्तीची…
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) January 20, 2024