Tuesday, May 21, 2024

युवकावर धारदार शस्त्राने सपासप वार, नगर तालुक्यातील घटना…..

पैशांचे व्यवहारावरुन झालेले वादातुन एकावर धारदार चाकूने सपासप वार करत जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना नगर तालुक्यातील वडगाव गुप्ता शिवारात शेंडी बायपास रोडवर डोंगरे वस्ती जवळ सोमवारी (दि.१५) रात्री १० च्या सुमारास घडली आहे.

या मारहाणीत अशोक श्रीधर शेळके (वय ६०, रा. वडगाव गुप्ता, ता.नगर) हे गंभीर जखमी झालेले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जखमी शेळके व आरोपी निखील शिवाजी गांगर्डे, (रा.वडगाव गुप्ता शिवार, ता.नगर) यांचे पैशांचे व्यवहारावरुन सोमवारी (दि.१५) रात्री १० च्या सुमारास शेंडी बायपास रोडवर डोंगरे वस्ती जवळ वाद झाले.

या वादातून गांगर्डे याने त्याच्या जवळील चाकूने शेळके यांच्यावर सपासप वार करत त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना त्यांच्या मुलाने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. त्यांचा मुलगा तुषार अशोक शेळके याने मंगळवारी (दि.१६) पहाटे एम.आय.डी.सी.पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी वरून पोलिसांनी आरोपी गांगर्डे याच्यावर भा. दं. वि.कलम ३०७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास स.पो.नि. माणिक बी. चौधरी हे करीत आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles