Friday, May 17, 2024

मुलींचा घटता जन्मदर कायम राहिला तर द्रौपदीसारखे करावं लागेल… अजितदादा काय बोलून गेले..

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष जोरदार प्रचाराला लागले आहेत. याच दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील ठीक-ठिकाणी बैठका आणि सभा घेत आहेत.

मुलींच्या जन्मदराबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की, बीड जिल्ह्यात काय प्रकार चालतात हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे भविष्यात मुलींची संख्या जर कमी असेल तर द्रौपदी सारखं करावं लागेल. असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं. आज अजित पवार यांनी पत्नी आणि महायुतीच्या बारामतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यासाठी प्रचार करताना डॉक्टर आणि वकिलांच्या मेळाव्याला संबोधित केलं. त्यावेळी ते बोलत होते.

त्यानंतर लगेचच अजित पवार म्हणाले, “यातला गंमतीचा भाग सोडून द्या, नाहीतर म्हणतील अजित पवारांनी द्रौपदीचा अपमान केला. मला कुणाचाही अपमान करायचा नाही. ” असं स्पष्ट करत अजित पवारांनी थेट हातच जोडले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles