Friday, May 17, 2024

जि.प.शाळेतील मुलीचा विनयभंग, शिक्षकाला सक्तमजुरीची शिक्षा…

अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी मदन रंगनाथ दिवे (रा. दाढ बु, ता. राहुरी) या शिक्षकास जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. व्ही. सहारे यांनी तीन वर्षांची सश्रम कारावास व १० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिन्यांची कैद, अशी शिक्षा सुनावली आहे.

शाळकरी मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी या शिक्षकाविरोधात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम १२ अन्वये ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. सुनावणीदरम्यान ९ साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये फिर्यादी, पीडित दोन मुली, मुख्याध्यापिका, शिक्षक, तपासी अधिकारी निरंजन जयंत बोकिल यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. सरकारी पक्षाच्या वतीने अॅड. मंगेश दिवाणे यांनी काम पाहिले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles