पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवार विद्यामान खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांचे भाचे पार्थ, वहिनी ‘बारामती’तील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्याकडून ५५ लाख रुपयांचे कर्ज घेतले आहे, तर सुनेत्रा पवार यांनी सुळेंसह पती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार आणि सासू आशाताई पवार यांनाही कर्ज दिले असल्याचे उघड झाले आहे.
सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांना ८२ लाख ८१ हजार ८७८ रुपये, अजित पवार यांना ६३ लाख २० हजार ३०३ रुपये, शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांना ५० लाख रुपये, तर सुप्रिया सुळे यांना ३५ लाख रुपयांचे कर्ज दिल्याचे त्यांच्या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे.
एकूण संपत्ती : १,२७,५९,९८,२०५ रु.
● जंगम मालमत्ता : १२,५६,५८,९८३,
● पती अजित पवार : १३,२५,०६,०३३ रुपये,
● इतर कुटुंब : ३,८३,६४,७९७
● वारसा हक्काने : ३३,०९,९९,६४९
● पतीकडे : ७५,०४,१८०
● कर्ज : १२,११,१२,३७४
● पती : ४,७४,३१,२३९
● रोख रक्कम : ३,९६,४५०
● पती : ३,१२,१३०
● वाहने : ट्रॅक्टर, ट्रेलर, तर अजित पवारांच्या नावे दोन ट्रेलर, टोयोटा, होंडा सीआरव्ही या चारचाकी.