ठाकरे गटाचे २ खासदार आमच्या संपर्कात, मोदींना पाठिंबा द्यायला तयार !

0
16

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत भाजपने २४० जागा जिंकल्या. त्यानंतर भाजप राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटक पक्षांच्या आधारावर सत्तास्थापन करणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. शिवसेना फुटीनंतर पहिल्यांदाच सामोरे गेलेल्या शिंदे गटाचे ७ उमेदवार जिंकले. तर ठाकरे गटाचे ९ उमेदवार जिंकले. लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी मोठा दावा केला आहे. ठाकरे गटाचे दोन खासदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी केला आहे. नरेश म्हस्के यांच्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी पत्रकार परिषदेत मोठा दावा केला. नरेश म्हस्के यांनी म्हटलं की, ठाकरे गटाचे २ खासदारांनी आमच्याशी संपर्क केला आहे. त्यांना मोदींना पाठिंबा द्यायचा आहे. अपात्रतेचा विषय असल्यामुळे ते थांबले आहेत. मात्र, ६ लोक लोक जमवून आमच्यासोबत येणार आहेत. दिल्लीत हे काल रात्री घडलं. विकासकामे व्हावीत, यासाठी ते यायला तयार आहेत. शिवसेनेच्या तत्वांसाठी आमच्यासोबत यायला तयार आहेत. आम्हाला दबाव टाकण्याची गरज नाही’.