अजितदादा गटातील माजी आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत..

0
19

विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. अजितदादा गटातील माजी आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे. विधान परिषदेवरील माजी आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी पक्षप्रवेशाची घोषणा केली आहे.

“आज सकाळी रामा हॉटेल छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे माझे नेते शरदचंद्रजी पवार साहेबांसोबत प्रदीर्घ चर्चा झाली. आज दुपारी दोन वाजता राष्ट्रवादी भवन संभाजीनगर येथे पवार साहेबांच्या उपस्थितीत ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार’ पक्षात माझा प्रवेश होणार आहे.” असं दुर्रानी यांनी सांगितलं.