Thursday, May 9, 2024

नगर जिल्हा रुग्णालयाच्या आवारात महिलेवर अत्याचार !वाहन चालकासह सात जणांविरोधात गुन्हा दाखल

नगर येथील जिल्हा रूग्णालयाच्या लसीकरण विभागासमोरील ओट्यावर एका महिलेवर अत्याचार करून तिला मारहाण केल्याची घटना सोमवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास घडली.

उपनगरात राहणाऱ्या पीडित महिलेने याप्रकरणी रात्री उशिरा दिलेल्या फिर्यादीवरून सात जणांविरोधात तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्यामध्ये रूग्णवाहिकेचा चालक, जिल्हा रूग्णालयातील वॉचमन यांचा देखील समावेश आहे.

शानु शब्बीर शेख (रा. बारा इमाम कोठला, नगर), बासीद मुक्तार खान (रा. खान मळा, लिंक रस्ता, केडगाव), रूग्णवाहिकेचा चालक आशिष जाधव (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही), जिल्हा रूग्णालयातील वॉचमन पवन गाडे (रा. भारस्कर कॉलनी, लाल टाकी, नगर),

शकील मोमीन शेख (रा. रेणुका मंदिरामागे, अंबिकानगर, केडगाव) व दोन महिला अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. अधिक तपास महिला सहाय्यक निरीक्षक पी. ए. श्रीवास्तव करीत आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles