नगर (प्रतिनिधी)- पेट्रोल, डिजेलला पर्याय व प्रदुषणमुक्त शहरासाठी बाजारपेठेत अद्यावत सोयी-सुविधांसह दाखल झालेल्या नगर-छत्रपती संभाजी नगर महामार्ग, शेंडी येथील जीत बजाज मोटर्स शोरुममध्ये बजाजच्या चेतक प्रिमियम आणि चेतक अर्बन या ई स्कुटरचे अनावरण व वितरण श्री विशाल गणपती देवस्थानचे विश्वस्त प्रा. माणिक विधाते यांच्या हस्ते करण्यात आले. या वाहनांची मागणी लक्षात घेता पहिल्याच दिवशी 4 तर पुढील तीन दिवसात तब्बल 11 वाहनांचे वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमाप्रसंगी इंद्रजीत नय्यर, अभिमन्यू नय्यर, जनक आहुजा, राजीव बिंद्रा, रवी बक्षी, अनुज बिंद्रा, हरजीतसिंह वाधवा, काका नय्यर, मनीष नहार, साहिल नहार, गुरविंदरसिंग वाही, राजेंद्र कंत्रोड, गुलशन जग्गी, इंजि. केतन क्षीरसागर, योगीराज गाडे, जतीन आहुजा, जितू गंभीर, अनिश आहुजा, चिटू गंभीर, जय रंगलानी, रोहित सरना, गौरव जग्गी, कुणाल चोप्रा, विजय जग्गी, बलजीतसिंग बिर्ला, अमनप्रीत वाही, युवराज गाडे, विकी आहुजा, कुलबिरसिंग वाही आदी उपस्थित होते.
प्रा. माणिक विधाते म्हणाले की, वाहनांचे वाढते प्रदुषण पर्यावरणासाठी घातक ठरत असून, पर्यावरण संवर्धनासाठी इलेक्ट्रिक व्हीकल सर्वोत्तम पर्याय आहे. दिवसंदिवस वाहनांच्या संख्येत वाढ होत असून, इंधनाचे दर देखील गगनाला भिडत आहे. सर्वसामान्यांना कामानिमित्त ई स्कुटर परवडणार आहे. पैश्याची बचत म्हणून इलेक्ट्रिक व्हीकलला नागरिकांची देखील पसंती मिळत आहे. बजाजच्या ई स्कुटरमध्ये असलेल्या गुण वैशिष्ट्यामुळे ग्राहकांची वाढती मागणी दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले.
चेतक प्रिमियमचा टॉप स्पिड 126 कि.मी. प्रति तास पर्यंन्त आहे. एका चार्जमध्ये 73 किलोमीटर चालत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. तर चेतक अर्बनची टॉप स्पिड 113 कि.मी. प्रति तास पर्यंन्त आहे. एका चार्जमध्ये 63 किलोमीटर चालत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. दोन्ही मॉडेल पूर्णत: स्टील बॉडी व आकर्षक लुक मध्ये 5 रंगात उपलब्ध आहे. एक चार्ज 4:30 तास व अर्बन मध्ये 4 तास 50 मिनीटात चार्ज होते. इतर ई स्कुटरपेक्षा अधिक सोयी-सुविधांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. 3 वर्षाची 50 हजार किलोमीटर पर्यंन्तची वॉरन्टी देण्यात आली आहे.