प्रतिकूल परिस्थितीवर मात करत MPSC परीक्षा उत्तीर्ण होत पीएसआय बनलेल्या लावण्या देविदास अक्कन हिचा आमदार संग्राम जगताप यांनी सत्ककार करून पुढील काळात उज्जवल कामगिरी करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
शहरातील तोफखाना परिसरातील पद्मा वडापाव सेंटर चालकाच्या या मुलीने जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यशाचे शिखर गाठत आई वडिलांच्या कष्टाचे चीज केलं आहे. तिचा हा प्रवास सर्वांनाच प्रेरणादायी आहे. कोरोना काळात सगळं काही ठप्प असताना, तीच संधी साधत त्या वेळेचा सदुपयोग करत लावण्या अक्कन MPSC परीक्षेतून पीएसआय बनली आहे. तिने सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांसमोर एक आदर्श उभा केला आहे, त्याचबरोबर शहरातील पद्मसाळी समाजाचा नावलौकिक वाढविला आहे. तिने आगामी काळात शासकीय सेवेत कार्यरत करत असताना आपल्या शहराचे व देशाचा गौरव होईल असे कार्य करावे. इतर विद्यार्थ्यांनीही लावण्याचा आदर्श घेत शिक्षण क्षेत्रात वाटचाल करावी.
यावेळी प्रा. अरविंद शिंदे, देविदास अक्कन, हरिभाऊ येलदंडी आदी उपस्थित होते.







Good
Comments are closed.