Monday, May 20, 2024

वाडिया पार्क मैदान उजळणार, क्रीडा मंत्री बनसोडे यांनी दिले फ्लड लाईट बसवण्याचे निर्देश

अहमदनगर दि. 20 जानेवारी :- राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे यांनी येथील वाडीया पार्क क्रीडा संकुलास प्रत्यक्ष भेट देत क्रीडा सुविधांची पहाणी केली. राज्यातून अधिकाधिक चांगले खेळाडू निर्माण होऊन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर चांगली कामगिरी करत राज्याचा व देशाचा नावलौकिक व्हावा यासाठी क्रीडा विकासाला शासनामार्फत प्राधान्य देण्यात येत असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

यावेळी आमदार संग्राम जगताप, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, प्र जिल्हा क्रीडा अधिकारी दिलीप दिघे यांच्यासह विविध क्रीडा संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

क्रीडामंत्री श्री बनसोडे म्हणाले की, अहमदनगर येथील क्रीडा संकुल विभागीय क्रीडा संकुलापेक्षा अधिक दर्जेदार निर्माण होईल यादृष्टीने आराखडा करत आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा निर्माणासाठी प्रस्ताव तातडीने पाठविण्यात यावा. प्रस्तावास तातडीने मान्यता देण्यात येईल. क्रीडा विकासासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नसल्याची ग्वाहीही मंत्री श्री बनसोडे यांनी यावेळी दिली.

खेळाडूंसोबत क्रीडामंत्र्यांनी साधला संवाद

जिल्हा क्रीडा संकुलाच्या पाहणी दरम्यान क्रीडा मंत्री श्री बनसोडे यांनी मैदानावर उपस्थित असलेल्या खेळाडूंची संवाद साधत त्यांना खेळासाठी मिळणाऱ्या सुविधा, त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. उपस्थित खेळाडूंपैकी चिमुकल्या खेळाडूने क्रीडांगणावर रात्रीच्या वेळेस अंधार असतो विजेची सुविधा करावी अशी मागणी करताच क्रीडामंत्री श्री बनसोडे यांनी नाविन्यपूर्ण योजनेतून क्रीडांगणावर फ्लड लाईट तातडीने बसवण्याचे निर्देश जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना दिले.

यावेळी विविध क्रीडा संघटनांनी मांडलेल्या अडचणी जाणून घेत त्यांची निवेदनही क्रीडामंत्र्यांनी स्वीकारली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles