नगर शहरात पुन्हा राडा, एकवीरा चौकातील हाणामारीत राष्ट्रवादीचा पदाधिकारी गंभीर जखमी

0
45

नगर शहरात पाइपलाइन रोडवरील एकवीरा चौकात दोन गटात तुफान राडा झाला आहे. या घटनेत राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी अंकुश चत्तर गंभीर गंभीर जखमी झाले आहेत.त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, सावेडी उपनगरातील एकविरा चौकात शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास तुफान राडा झाला. दोन गटांमध्ये हाणामारी झाली. दगडफेक झाल्याची माहिती देखील समोर येत आहे. या घटनेत राष्ट्रवादीचा एक पदाधिकारी गंभीर जखमी झाला आहे. अंकुश चत्तर असं त्यांचं नाव आहे, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.