Tuesday, May 21, 2024

जिल्हा सहकारी बँकेची सभासद शेतकऱ्यांना गुड न्यूज…. पीक कर्ज व्याजाबाबत महत्त्वाचा निर्णय…

अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभासद प्राथमिक वि.का. सेवा सहकारी संस्थांनी ज्या पिक कर्जदार सभासदांकडील नियमित पिक कर्ज परतफेड करणाऱ्या सभासदाकडील रू. ३.०० लाखापर्यतचे कर्जावरील दिनांक ०१/०३/२०२४ ते दि.३१/३/२०२४ पर्यंत वसुल केलेले व शासनाच्या व्याज परताव्याच्या धोरणा प्रमाणे सन २०२३-२०२४ चे व्याज परताव्यास पात्र असलेले कर्जदार शेतकरी सभासदांना परत करण्याचा बँकेने निर्णय घेतला होता त्या पध्दतीने जिल्हयातील बहुतांश कर्जदार शेतकरी सभासदांना वसुल व्याज बँकेने परत केले असुन आता शेतकऱ्यांच्या मागणीनुसार दिनांक १ एप्रिल २०२३ ते दि.३१ मार्च २०२४ पर्यंत पिक कर्ज वसुल व्याजही कर्जदार शेतकऱ्यांना परत करण्याचा महत्वपुर्ण निर्णय जिल्हा बँकेच्या आज झालेल्या कार्यकारी कमिटीचे सभेत घेण्यात आल्याची माहिती बँकेचे चेअरमन माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले यांनी दिली.

बँकेने दिनांक १/३/२०२४ ते दि.३१/३/२०२४ पर्यंतचे पिक कर्ज वसुल व्याज परत पिक कर्जदार शेतकरी सभासदांना देण्याचे निर्णयानुसार जिल्ह्यातील १५४८४० शेतकऱ्यांना रक्कम रू.७३ कोटी ८५ लाख रक्कम संबंधीत सोसायटीच्या करंट खाती बँकेने जमा केली आहे.त्यापैकी ७४३९१ सभासदांचे सेव्हिंग्ज खाती रक्कम रू ३७ कोटी ६१ लाख वसुल व्याज जमा केले आहे. उर्वरीत शेतकरी सभासदांनी आपली हमीपत्र संबंधीत सेवा सहकारी संस्था व शाखेस सादर करून त्यांनी आपले वसुल व्याज परत घ्यावे असे आवाहन बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डीले यांनी केले.

१ एप्रिल २०२३ पासुन पिक कर्ज वसुल व्याज परत करण्याच्या निर्णयामुळे जिल्हयातील कोणताही शेतकरी यापासुन वंचित राहाणार नसुन जिल्ह्यातील विविध कार्यकारी सेवा सोसायटयांनी आता १ एप्रिल २०२३ पासुनचे वसुल पिक कर्जावरील वसुल व्याज परत करण्याचे प्रस्ताव सोसायट्यांनी बँकेच्या संलग्न शाखेत त्वरीत सादर करून शेतकरी सभासदांचे वसुल व्याज लवकरात लवकर व्याज परत करण्याच्या दृष्टीने सोसायट्यांनी अंमलबजावणी करावी. बँकेने जिल्हयातील विविध कार्यकारी सेवा सोसायटी मार्फत शेतकऱ्यांना खरीप हंगामाकरीता १७९९९० शेतकरी सभासदांना रू. १३८० कोटी ५६ लाखाचे नविन पिक कर्ज वाटप केले असुन बँकेकडून शेतकऱ्यांना त्वरीत कर्ज वाटपाचे कामकाज केले जात असल्याचे देखील ते म्हणाले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles