Tuesday, May 21, 2024

बीडमध्ये पंकजा मुंडेंना मोठा धक्का; महाविकास आघाडीची ताकद वाढली!

बीड लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना मोठा धक्का बसला आहे. माजी मंत्री सुरेश नवले यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. अगदी काहीच दिवसांपूर्वी नवले यांनी शिवसेना शिंदे गटाला जय महाराष्ट्र केला होता.

एकनाथ शिंदे यांच्याकडे लाभार्थ्यांची गर्दी होत असल्याने निष्ठावंत शिवसैनिकांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत सुरेश नवले यांनी शिंदेंच्या शिवसेनेला रामराम केला होता.आता त्यांनी बजरंग सोनवणे यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे.

नवले यांची बीडमध्ये मोठी ताकद आहे. त्यांच्या पाठिंब्याने महाविकास आघाडीची ताकद वाढली असून महायुतीला मोठा झटका बसला आहे. बीड लोकसभा मतदारसंघातून यंदा भाजपने पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीने बजरंग सोनवणे यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं आहे.बजरंग सोनावणे हे मराठा उमेदवार असल्याने बीडमध्ये ओबीसी विरुद्ध मराठा असा थेट सामना रंगण्याची शक्यता आहे. अशातच सुरेश नवले यांनी सोनवणे यांना पाठिंबा जाहीर केल्याने पंकजा मुंडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, आगामी काळात बीडमधून विधानसभेची निवडणूक देखील लढवणार असल्याचं सुरेश नवले यांनी जाहीर केलं आहे.
एक कार्यकर्ता मेळावा घेत नवले यांनी ही घोषणा केली आहे. मात्र, कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार हे त्यांनी स्पष्ट केलेलं नाही. “सध्या सत्ता मिळाल्याने मुख्यमंत्र्यांकडे अनेक लाभार्थ्यांची गर्दी होत आहे, मात्र पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी काहीच काम होताना दिसत नाही. त्यामुळे अनेकजण नाराज असून शिवसेनेतून बाहेर पडत आहेत”, असं नवले यांनी म्हटलंय.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles