Saturday, May 4, 2024

निलेश लंके यांची लेव्हल काढणाऱ्यांनी स्वत:ची लेव्हल तपासावी : अभिषेक कळमकर

तुतारीला मिळणारा प्रतिसाद पाहून त्यांच्या पायाखालची जमिन सरकली आहे

नगर : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवाराचा उमेदवारी अर्ज दाखल करताना नगर शहराचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी लोकसभेचे विरोधी उमेदवार आ.निलेश लंके यांच्याबद्दल बोलणार नाही, त्यांची तेवढी लेव्हल नसल्याचे वक्तव्य केले. शहराच्या आमदारांचे हे वक्तव्य वैफल्यातून आलेले आहे. मुळात लंके यांची लेव्हल काय आहे हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ओळखली म्हणूनच त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली. उलट तुम्हाला शरद पवारांनी मागील वेळी लोकसभेची उमेदवारी दिली तेव्हा नगर दक्षिणेतील जनतेने तुम्हाला तुमची लेव्हल दाखवून दिली. ज्यांच्याकडून लोकसभेला मोठा पराभव झाला त्यांचाच झेंडा हातात घेण्याची वेळ तुमच्यावर आली आहे. निलेश लंके यांना मतदारसंघात मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद, त्यांची प्रचंड लोकप्रियता यामुळे महायुतीतील सगळेच चिंतेत पडले आहेत, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी दिली आहे.

अभिषेक कळमकर यांनी म्हटले आहे की, लोकसभा निवडणुकीसाठी निलेश लंके यांच्यासारख्या लोकप्रिय आणि सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीची उमेदवारी जाहीर झाल्यापासून विरोधक त्यांच्यावर वैयक्तिक लक्ष्य करीत आहेत. लंके यांची लेव्हल काढण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. वास्तविक लंके यांना जनसंवाद यात्रेतून सर्वसामान्य मतदारांनी दिलेले पाठबळ पाहून विरोधकांच्या पायाखालची जमीन घसरली आहे. लंके यांना वैयक्तिक टार्गेट करूनही जनता त्यांनाच डोक्यावर घेत आहे हे पाहून टिका करताना विरोधकांची लेव्हल घसरत आहे. तुतारीचा गजर नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात परिवर्तन घडविणार हे जवळपास निश्चित झालेले आहे. त्यामुळे केवळ आपल्या महायुतीच्या उमेदवारापुढे खूप काम करतोय असे दाखविण्याची धडपड शहराचे आमदार करीत आहे. यातून काहीही साध्य होणार नाही. यावेळी नगर शहरातूनही लंके यांना प्रचंड मताधिक्य मिळेल असा विश्वास कळमकर यांनी व्यक्त केला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles