Tuesday, May 28, 2024

अर्ज दाखल करताना निलेश लंकेची गर्जना…मी पैलवानच आहे. मै किसके भी साथ खेलुंगा..

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार माजी आमदार नीलेश लंके यांनी कोणताही गाजावाजा न करता, कोणतेही शक्तfप्रदर्शन न करता नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी साधेपणाने अर्ज भरला.

नीलेश लंके यांनी अर्ज भरत असताना कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयबाहेर गर्दी केली होती. हनुमान जयंतीचे निमित्त साधत कार्यकर्त्यांनी त्यांना पितळी आणि चांदीची गदा भेट दिली. या गदा हातात घेतात, “मी हनुमानरायांचा भक्त आहे. गदा कोणालाही मिळत नसते. मी पैलवानच आहे. मै किसके भी साथ खेलुंगा”, असे आव्हान नीलेश लंके यांनी विरोधकांना दिले. लंके यांनी हनुमान जयंतीचा मुहूर्त साधत नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला. लंके म्हणाले, “नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघांमध्ये काम करण्याची मोठी संधी आहे. जनशक्ती आणि त्यांच्या आशीर्वादाच्या जोरावर हा उमेदवारी अर्ज भरला आहे. कार्यकर्त्यांनी प्रेमापोटी दिलेली या दोन्ही गदा हनुमान भक्त म्हणून स्वीकारतो. मी पैलवान आहे कोणाशीही लढू शकतो. ही लढाई धनशक्तीविरद्ध जनशक्ती अशी आहे”. लंके म्हणाले, “नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघांमध्ये काम करण्याची मोठी संधी आहे. जनशक्ती आणि त्यांच्या आशीर्वादाच्या जोरावर हा उमेदवारी अर्ज भरला आहे. कार्यकर्त्यांनी प्रेमापोटी दिलेली या दोन्ही गदा हनुमान भक्त म्हणून स्वीकारतो. मी पैलवान आहे कोणाशीही लढू शकतो. ही लढाई धनशक्तीविरद्ध जनशक्ती अशी आहे”.

यावेळी नगर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष श्री. राजेंद्र फाळके, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्री. जयंत वाघ, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा. श्री. शशिकांत गाडे, आम आदमी पार्टी जिल्हाध्यक्ष श्री. राजू आघाव आदि मान्यवर उपस्थित होते

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles