Saturday, May 18, 2024

निलेश लंके म्हणतात…मुख्यमंत्री व माझे जवळचे संबंध, कोणी आमच्यात वितुष्ट निर्माण करू नये

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार नीलेश लंके यांनी हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर साध्या पद्धतीने दोन उमेदवारीअर्ज दाखल केले.

 • माजी आमदार दादा कळमकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट), जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांच्यासह घनश्याम शेलार, प्रताप ढाकणे, संभाजी कदम, किरण काळे, संपत म्हस्के, कैलास दळवी, अभिषेक कळमकर, विक्रम राठोड आदी पदाधिकारी उपस्थित होते. उमेदवारीअर्ज दाखल केल्यानंतर लंके यांनी माध्यमांशी संवाद साधला.
  काल झालेल्या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नो लंके-ओन्ली विखे अशी घोषणा दिली. यासंदर्भात बोलताना लंके म्हणाले, मुख्यमंत्री व माझे जवळचे संबंध आहेत. ते मला व मी त्यांना जवळून ओळखतो. त्यामुळे कोणी आमच्यामध्ये वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये. मुख्यमंत्र्यांनी काल झालेल्या सभेत लंका दहन करण्याचे आवाहन केले. या संदर्भात बोलताना लंके म्हणाले, की एखाद्याच्या व्यासपीठावर गेल्यानंतर अशा पद्धतीची भाषणे करावी लागतात. त्यासाठी टाळ्या मिळतात. परंतु आपण त्याला उत्तर दिलेच पाहिजे असे नाही.

 • Related Articles

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here

  Stay Connected

  0FansLike
  3,912FollowersFollow
  0SubscribersSubscribe
  - Advertisement -

  Latest Articles