Tuesday, May 21, 2024

नगरमध्ये व्यापाऱ्यांचा लंके यांना एकमुखी पाठिंबा! लंके यांनी दिले ‘हे’ आश्वासन

अहमदनगर : लोकसभा निवडणुकीचा दुसऱ्या टप्प्यातील प्रचार जोरात सुरु झाला आहे. उमेदवारी वैयक्तिक गाठीभेटी घेत आहेत. त्यातच उमेदवार निलेश लंके यांनी नगर क्लब येथे व्यापारी व नागरिकांच्या भेटी घेतल्या. यावेळी लंके यांना मोठा प्रतिसाद मिळाला. तसेच तेथील व्यापाऱ्यांनी लंके यांना एकमुखी पाठिंबा दिला.

सोमवारी सकाळी नगर शहरातील नगर क्लब येथे लोकसभेचे उमेदवार आमदार निलेश लंके यांनी शहरातील व्यापाऱ्यांशी व नागरिकांची संवाद साधला. नगर शहराच्या संरक्षणाचा मुद्दा नागरिकांनी प्रामुख्याने आमदार लंके यांच्यासमोर मांडला त्यावर नगरकरांना पूर्णपणे संरक्षण देण्याचे आश्वासन आमदार लंके यांनी दिले.

तसेच खासदार झाल्यावर संसदेत नगरकरांना अभिमान वाटेल असं काम करून दाखवेल असं आश्वासन आमदार लंके यांनी दिले. निलेश लंके यांचा साधेपणा नागरिकांना भावला असून नगर शहरातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असल्याने विरोधी उमेद्वाराला लंके आता वरचड ठरू लागले आहेत असे बोलले जातं आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles