नगर दौऱ्यावर आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या निवडक पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेतल्या. सभेनंतर व्यासपीठाच्या मागील बाजूस निवडक पदाधिकाऱ्यांच्या भेटीची व्यवस्था करण्यात आली होती. या दरम्यान काँग्रेसमधून भाजपमध्ये नव्याने आलेले विनायक देशमुख यांचीही मोदींशी भेट झाली. देशमुख हे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे भाचे आहेत. हे समजताच मोदींनी हजारे यांच्या तब्येतीची विचारपूस केली. त्यांना सांगा काळजी घ्या, काही गरज पडली तर आमच्या कार्यालयात फोन करा, असा निरोप मोदींनी देशमुख यांच्याकडे दिला. देशमुख यांनी हजारे यांना याबाबत माहिती दिल्यावर हजारे यांनी मोदींचे आभार मानले. देशमुख यांनीच या भेटीची आणि झालेल्या चर्चेची माहिती प्रसारमाध्यमांना दिली आहे.
नगरमध्ये पंतप्रधान मोदींनी केली अण्णा हजारेंच्या प्रकृतीची चौकशी, म्हणाले त्यांना नमस्कार सांगा
- Advertisement -