Tuesday, May 13, 2025

नगर शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा कधी? सुजय विखेंनी सांगितली तारीख आणि वेळ….

अहमदनगर शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेची तारीख पुढे ढकलली असल्याची माहिती खासदार सुजय विखेंनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महायुतीचे उमेदवार सुजय विखेंच्या प्रचारार्थ सहा मे रोजी नगर शहरात सभा होणार होती. मात्र आता पंतप्रधान मोदींची सभा ही 7 मे रोजी सायंकाळी 4:30 वाजता होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्र दौरा एक दिवसाने पुढे ढकलला असल्याचे महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांनी सांगितले आहे. नगर शहरातील संत निरंकारी भवन जवळील अठरा एकर मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेनंतर निवडणुकीचे वातावरण बदलून जाते आणि प्रचाराचा विषयच संपून जातो, असा विश्वास विखेंनी व्यक्त केलाय.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles