Friday, May 17, 2024

सुजय विखेंच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीतर्फे महिला मेळावा, धनश्रीताई विखे यांनी केले आवाहन…

नगर : लोकसभा निवडणूक ही देशाच्या भवितव्यासाठी असून ही सत्ता कोणाच्या हाती द्यायची आणि देश कोण सुरक्षित ठेवू शकतो यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करायचे आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचा मानसन्मान झाला आहे तरुण पिढीच्या उज्वल भविष्यासाठी आपल्या सर्वांना काम करावे लागणार आहे, केंद्र शासनाच्या योजना खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी जनतेपर्यंत घेऊन जाण्याचे काम केले आहे जनतेची केलेली विकास कामे सांगण्याची गरज नाही आम्ही गेल्या 50 वर्षापासून काम करत आहोत या माध्यमातून जनतेचा विश्वास संपादन केला आहे. खासदार सुजय विखे यांनी पाच वर्षांमध्ये आपली जबाबदारी पार पाडली आहे, वयोश्री योजना यशस्वीपणे राबवली असल्यामुळे आपल्या मतदारसंघाचा देशात नावलौकिक झाला या योजनेमुळे ज्येष्ठ नागरिकांना आधार मिळाला, महिलांचे सक्षमीकरण करत बचत गटांना मदत केली त्यामुळे महिलांच्या हाताला काम मिळाले आम्ही वर्षानुवर्ष आरोग्यसेवा करत आहोत, मात्र आम्ही कधीही जाहीर केले नाही मात्र समोरील उमेदवार नौटंकी करत जनतेची दिशाभूल करत आहे, त्यांच्याकडे विकास कामाचे धोरण नाही महिलांनी ही निवडणूक हाती घेतली असून मतदानाचा हक्क बजावत विजय पक्का केला आहे असे प्रतिपादन धनश्री विखे यांनी केले.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांच्या वतीने महिला मेळाव्याचे आयोजन केले यावेळी धनश्री विखे पाटील शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला शहर जिल्हाध्यक्ष रेश्मा आठरे, माजी नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, माजी नगरसेविका शितल जगताप, मीना चव्हाण किरण बारस्कर आदीसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
शीतल जगताप यांनी सांगितले की, शहरात विकासाच्या कामावर मतदान रुपी आशीर्वाद मागत आहे, चांगल्या कामाच्या माध्यमातून नगरकर नक्कीच खा. सुजय विखे पाटील यांना विजयी करतील असे त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना किरण बारस्कर म्हणाल्या की, नगर शहरामध्ये आम्ही आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली काम करत असून आम्ही विकास कामाच्या जोरावर राजकारण करत असल्यामुळे नगर शहरातील जनता आमच्याबरोबर आहे तसेच विकासाचे व्हिजन असणारे खासदार निवडून द्यावे असे आवाहन बारस्कर यांनी केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles