Saturday, May 18, 2024

एकट्या नगरमध्ये पाच ते सहा सभा घेणाऱ्यांनी पंतप्रधानांवर बोलावं हे हास्यास्पद, सुजय विखेंचा शरद पवारांना टोला…

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राज्यात जास्तीत जास्त सभा व्हाव्या, यासाठी राज्यात पाच टप्प्यात निवडणूक घेतल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. यावरून भाजपचे अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुजय विखे पाटील यांनी शरद पवार यांच्या नगर जिल्ह्यात होणाऱ्या सभांवरून त्यांना टोला लगावला आहे.

शरद पवार हे महाराष्ट्राचे आणि देशाचे ज्येष्ठ नेते असून यांनी महाराष्ट्रभर फिरलं पाहिजे, मात्र ते नगरमध्येच पाच ते सहा सभा घेत आहेत. तर अजूनही काही कॉर्नर सभा ते घेणार असल्याचं मला कळलं आहे. त्यामुळे त्यांनी पंतप्रधानांवर बोलणे हे हास्यास्पद असल्याचा टोला सुजय विखेंनी शरद पवारांना लगावलाय.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles