पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नगरमधील सभेच्या खर्चावर आक्षेप…’मविआ’ करणार तक्रार

0
25

नगर: महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांच्या प्रचारासाठी झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचा खर्च केवळ १२ लाख रुपये दाखवण्यात आला. सरकारी यंत्रणेचा गैरवापर करीत हा खर्च कमी दाखवण्यात आला, असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी हरकत नोंदवली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नगर शहरात ७ मे रोजी सभा झाली. आमच्या एखाद्या साध्या सभेचा खर्च चार ते पाच लाख रुपये सरकारी यंत्रणेकडून दाखवला गेला. सरकारी यंत्रणेकडून या संदर्भात दुजाभाव केला जात आहे असाही आक्षेप जिल्हाध्यक्ष फाळके यांनी घेतला आहे.

या संदर्भात आपण संबंधितांकडे पुरावेही दाखल करू, असे त्यांनी स्पष्ट केले.